..अन् आज दुर्गेश ठणठणीत आहे!
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । वडील हयात नाही, काकाच्या सहकार्याने व मदतीने जीवन जगत असलेला दुर्गेश प्रल्हाद पाटील (वय १६) हा काही दिवसांपूर्वी जे जे हॉस्पिटल मुंबई येथे एका कठीण शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात ऍडमिट झाला. परंतु, कधी शस्त्रक्रिया होईल हे निश्चित होत नव्हतं मात्र, शस्त्रक्रिया करणे खूप आवश्यक होते. त्याचवेळी दुर्गेश चे काका जितू पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट नाथाभाऊंना संपर्क केला व सर्व कथा सांगितली. दरम्यान, नाथाभाऊंनी ताबडतोब व्यवस्थापकांशी संपर्क केला व दुर्गेशची लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले. दुर्गेश आज बरा झाला असून ठणठणीत आहे, मुंबईहून घरी परतताच त्यांनी थेट त्यांच्या काकासह नाथाभाऊंची भेट घेतली व तुमच्यामुळे मी आज तुमच्यासमोर उभा असल्याचे भावना व्यक्त करत सोळा वर्षाच्या दुर्गेशने मनापासून नाथाभाऊंचे आभार मानले.
झाले असे की, दुर्गेश प्रल्हाद पाटील (वय १६) एक लहान मुलगा दुर्दैवाने वडील या जगात नाही अशाही परिस्थितीत काका जितू पाटील यांच्या सहकार्याने व मदतीने आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय काही दिवसांपूर्वी जे जे हॉस्पिटल मुंबई येथे एका कठीण शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात ऍडमिट झाला. कधी शस्त्रक्रिया होईल हे निश्चित होत नव्हतं शस्त्रक्रिया करणे खूप आवश्यक होते अशा वेळेस दुर्गेश चे काका जितू पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता जे जे हॉस्पिटल मधूनच नाथाभाऊंना थेट संपर्क केला सर्व कथा सांगितली, नाथाभाऊंनी ताबडतोब व्यवस्थापकांशी संपर्क केला व दुर्गेश ची लवकरात लवकर शस्त्रक्रिया करावी व त्याच्या तब्येतीची अधिक काळजी घ्यावी अशी सूचना केली. आणि दुर्गेश ची शस्त्रक्रिया ठरली दुर्गेश बरा झाला आज दुर्गेश ठणठणीत आहे.
मुंबईहून घरी आल्या आल्या सर्वप्रथम मला नाथाभाऊंना भेटायचे आहे असे त्याने त्यांच्या काकांना सांगितले आणि आज दुर्गेश नाथाभाऊ याना भेटावयास आला नाथाभाऊ ना नमस्कार केले नतमस्तक झाला व तुमच्यामुळे मी आज तुमच्यासमोर उभा आहे असे म्हटले सोळा वर्षाच्या दुर्गेशने मनापासून नाथाभाऊंचे आभार मानले. यावेळी उपस्थित प्रा डॉ सुनील नेवे, अशोक लाडवंजारी संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील, अक्षय महाजन, राजेश बावस्कर, काका जितू पाटील उपस्थित होते.