जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । आनंद दिघे (Anand Dighe) यांच्यासोबत कश्या प्रकारचे राजकारण झाले. हे लवकरच सांगीन असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यामुळे महाराष्ट्र्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. याचबरबर विविध चर्चांना उधाण आले आहे.

मालेगाव येथील सभेत एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी बोलत असताना शिंदे म्हणले कि, आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. आम्ही गद्दार नाही. आम्ही चुकलो असतो तर आम्हाला लोकांनी समर्थन दिले नसते. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंची शिवसेना पुढे घेऊन चाललो आहोत. त्यामुळे आम्ही बरोबर आहोत असे मत नागरिकांचे आहे. असेही शिंदे म्हणाले.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीदेखील आम्हाला पाठिंबा दिला आहे. तुम्ही लढवय्ये आहोत. बाळासाहेबांचे नाव तुम्ही उज्ज्वल कराल, असे मोदी आपल्याला म्हणाल्याचे शिंदे यांनी सांगितले. माझे संपूर्ण भाषण त्यांनी ऐकले. मनापासून आपण भाषण केले, असे मोदी म्हणाले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.