⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

जळगावात धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने वृद्ध ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२३ । धावत्या रेल्वेचा धक्का लागून ८५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अर्जुन भिवसन चौधरी (वय-८५, रा. कांचन नगर, जळगाव) असे मयत वृध्दाचे नाव असून याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असं की, जळगाव शहरातील कांचनगरात राहणारे अर्जुन भिवसन चौधरी हे नेहमीप्रमाणे शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले. या दरम्यान जळगाव ते भादली दरम्यानच्या रेल्वे खंबा क्रमांक ४२१ -२ जवळ एका धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी ७ वाजता उघडकीला आले.

परिसरात राहणाऱ्या नागरीकांनी त्यांची ओळख पटविली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना व नातेवंडे असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ परिष जाधव करीत आहे.