---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे मुक्ताईनगर

वृद्धाचा नाल्यात बुडून मृत्यू, प्रौढाचा पूर्णा नदीपात्रात मृतदेह आढळला

crime
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथील पूर्णा नदीपात्रात पुरुषाचा मृतदेह शुक्रवारी आढळला. विनाेद लक्ष्मण पाटील (वय ४२) असे मृताचे नाव असून ताे बाेरसर येथील रहिवासी आहे.

crime

विनोद लक्ष्मण पाटील हे शुक्रवारी सकाळी आठ-साडेआठ वाजेच्या सुमारास शेतात जातो, असे सांगून घरून निघाले. मात्र त्यांची मोटरसायकल (क्र.एमपी १२ एमडी ७१२४) मुक्ताईनगर जवळील पूर्णा नदीच्या खामखेडा येथील पुलावर उभी केली असल्याचे आढळून आले. तेव्हापासून त्यांचा शाेध घेण्यात येत हाेता. त्यांचा मृतदेह दुपारी तीन वाजेच्या सुमारास आढळला. या प्रकरणी अशोक सीताराम पाटील यांच्या खबरी वरून मुक्ताईनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस हेकाॅ श्रावण जावरे करत आहे.

---Advertisement---

वृद्धाचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू

मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री पंचम येथील रहिवासी पुना भगवान कोळी (वय ७०) या वृद्धाचा गावाजवळील कहूपाठ नाल्यातील साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी रघुनाथ राजाराम कोळी (वय ६५) यांनी दिलेल्या खबरीवरून मुक्ताईनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सादिक पटवे करत आहेत.

हे देखील वाचा :

    Join WhatsApp Channel

    Join Now

    google-newsFollow on Google News

    Join Now

    ---Advertisement---