---Advertisement---
मुक्ताईनगर

मन सुन्न करणारी घटना! वाढदिवसाच्याच दिवशी चिमुकलीने घेतला जगाचा निरोप

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२३ । मुक्ताईनगर मधून मनाला चटका लावणारी एक दुर्दैवी घटना घडली समोर आलीय. वाढदिवसाच्या दिवशी कुलरचा शॉक बसल्याने नऊ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वैष्णवी चेतन सनान्से असे मृत चिमुकलीचे नाव असून चिमुरडीच्या अकाली निधनानं कुटुंबियांना जबर मानसिक धक्का बसला आहे.

muktainagar vaishnavi death jpg webp webp

नेमकी काय आहे घटना?
मुक्ताईनगर शहरातील जिजाऊ नगरात चेतन सनान्से परिवारासह वास्तव्यास असून चेतन सनान्से यांची मुलगी वैष्णवीचा शुक्रवारी वाढदिवस होता. शाळेला सु्ट्टी असल्याने वैष्णवी मलकापूर येथे तिच्या मावशीकडे गेली होती.

---Advertisement---

जळगावकरांनो सावधान! उष्माघातामुळे उपसरपंचाचा दुर्दैवी मृत्यू

वाढदिवस असल्याने तिला शुक्रवारी मुक्ताईनगर येथे तिच्या घरी आणण्यात आले होते. वैष्णवीच्या वाढदिवसाची जोरदार तयारी सुरु होती. तिच्यासाठी केक, नवीन कपडे आणण्यात आले होते. घरात स्वयंपाकाची लगबग सुरु होती.  सायंकाळी घर अगदीच पाहुणे मंडळींनी भरून गेलं होतं.

शेवटी केक कापण्याच्या निमित्ताने सगळे एकत्र आले, यावेळी वैष्णवी तयारी करून बसलेली होती. याचवेळी तिला कुलरचा तीव्र झटका बसला आणि त्यामुळे ती बेशुद्ध झाली. काही वेळात कुटुंबीयांनी तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ऐन वाढदिवसाला हृदय पिळवटून टाकणारी घटना घडल्याने परिसर सुन्न झाल्याचे पाहायला मिळाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---