मेजर रॉबर्ट गील यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या भुसावळात कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथील चित्रांची प्रतिकृती साकारणारे प्रसिध्द चित्रकार मेजर रॉबर्ट गील यांच्या स्मृतीदिनानिमित्त “आर्टीस्ट व्हिजन फाउंडेशन, भुसावळच्या वतीने रविवार दि.१० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मध्य रेल्वे रुग्णालयासमोरील ख्रिश्चन दफनभूमी येथे मेजर रॉबर्ट गील यांची समाधी आहे. या प्रसंगी जिल्ह्यातील ज्येष्ठ व नामवंत चित्रकार एकत्रित येउन ‘अजिंठा’ या विषयावर आपापल्या शैलीत चित्र साकारुन आदरांजली अर्पण करतील.
तसेच सेंट पॉल चर्चचे आचार्य व सेंट पॉल ख्रिश्चन सेमेस्ट्रीचे अध्यक्ष रेव्हरंट किशोर गायकवाड चर्चचे इतर सभासद हे प्रार्थना करतील यावेळी सहभागी चित्रकारांचा सन्मान करण्यात येईल. सर्व कलावंत व रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून मेजर रॉबर्ट गील यांना आदरांजली अर्पण करावी. असे आवाहन आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंन्द्र जावळे यांनी केले आहे.