⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | लोहारा वनविभागाच्या हद्दीत कुटीवर अज्ञातांचा अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने हल्ला

लोहारा वनविभागाच्या हद्दीत कुटीवर अज्ञातांचा अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने हल्ला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । रावेर तालुक्यातील लोहारा वन हद्दीत कंपार्टमेंट नंबर २४ येथे असलेल्या वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करण्याच्या उद्दीष्टाने वन संरक्षण कुटीवर शुक्रवारी काही अज्ञातांनी हल्ला करीत कुटीची तोड-फोड केल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल अजय बावने यांनी घटनास्थळी भेट देऊन हल्ला करणार्‍यांवरुद्ध पोलिसात तक्रार करण्याच्या सूचना वनपाल यांना दिल्या.

एसआरपीएफचा राहणार आता खडा पहारा

वनविभागाच्या लोहारा गावानजीक कंपार्टमेंट नंबर २४ असून येथे वन जमीन वृक्ष तोड थांबवण्यासाठी वन विभागाची वन संरक्षण कुटी आहे. येथे २४ तास वनमजुरांच्या माध्यमातून वनसंपदावर वाच ठेवला जातो. शुक्रवार १५ रोजी रात्री नऊच्या सुमारास वन संरक्षण कुटी वनमजूर सुपडू पावरा यांची गस्त सुरू असतांना काही अज्ञात लोकांनी वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करण्याच्या उद्दीष्टाने हल्ला केला. यात वन कुटीची तोडफोड झाली असून सौरदिव्ये चोरीला गेल्याचे वृत्त आहे. या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल अजय बावने घटनास्थळी भेट देऊन हल्ला करणार्‍यांविरुध्द पोलिसात तक्रार देण्याच्या सूचना वनपाल यांना दिल्या आहे तसेच संभाव्य अतिक्रमण व वृक्ष तोड होण्याचा धोका लक्षात घेऊन लवकरच एसआरपीएफचे जवान वनसंपदाच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात येणार आहे. वन संपदा अबाधीत ठेवण्याची जबाबदारी सुजान नागरीक म्हणून सर्वांची आहे. कुणीही अतिक्रमण करू नये, असे आवाहन वनक्षेत्रपाल अजय बावने यांनी केले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह