जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । यावल शहरात पालिकेकडून जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यासाठी खोदकाम करताना एक पुरातन विहीर आढळली. ही विहीर सुमारे ४० ते ५० फूट खोल असेल असा अंदाज आहे.या विहिरीचा पंचनामा करून पालिकेच्या माध्यमातून ती बुजवण्यात येइल,असे आश्वासन प्रभारी नगराध्यक्षांनी दिले.
शहरात विविध भागामध्ये पाइपलाइनचे काम सुरू आहे. या दरम्यान शहरातील मध्यवस्तीत असलेल्या खिर्णीपुरा भागात शेख इब्राहिम शेख चाँद यांच्या घराजवळ खोदकाम सुरू होते. त्यात एक पुरातन विहीर आढळली. ही विहीर सुमारे ४० ते ५० फूट खोल असेल असा प्राथमिक अंदाज आहे.
ही माहिती कामगार व भागातील नागरीक मझहर शेख सैफुद्यीन, शेख रफीक शेख फारूख, आसिफ खान समशेर खान, इद्रिस खान इसा खान यांनी प्रशासनास दिली. यानंतर प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, तलाठी ईश्वर कोळी, दादू धोत्रे यांनी भेट पंचनामा करण्यास सांगितले. तसेच रस्त्यात असलेली ही विहीर पालिकेच्या वतीने बुजवण्यात येईल असे आश्वासन दिले.
हे देखील वाचा :
- जळगाव शहरातून पुन्हा राजूमामा भोळे आमदार होणार? पाहा EXIT POLL
- जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- जळगाव जिल्ह्यात सूक्ष्म नियोजनामुळे मतदान सुरळीत; मतदान यंत्रात नगण्य त्रुटी
- जळगाव जिल्ह्यात संध्याकाळच्या 5 पर्यंत 54.69 टक्के मतदान; अनेक ठिकाणी शेवटच्या तासात मतदारांच्या केंद्रावरती रांगा