८ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, संशयित नराधम अटकेत ; चोपड्यातील घटना

ऑगस्ट 27, 2023 1:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२३ । महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच असून अशातच चोपडा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ८ वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग करून अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयित नराधमाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

image 46 jpg webp

चोपडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ८ वर्षीय मुलगी ही २६ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते तीन महिन्याच्या सुमारास घरी असताना संशयित आरोपी ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग याने पीडित मुलीला घरी बोलून तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्यानंतर अत्याचार केला.

Advertisements

हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर तिच्या आई-वडिलांसह तिने चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग यांच्या विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now