⁠ 
बुधवार, मे 8, 2024

अमृत महोत्सव लेखनमाला : राष्ट्रव्यापी स्वातंत्र्यसंग्राम- १८५७चा उद्घोष, ‘मारो फिरंगी को’

सशस्त्र क्रांतीची सुवर्णांकित पाने भाग-२

साता समुद्राच्या पलीकडून आलेल्या ईसाई व्यापाऱ्यांच्या निरंकुश सत्तेला मुळापासून संपविण्याकरिता १८५७ मध्ये समस्त देशवासियांनी  जात-पंथ यातून बाहेर येऊन राष्ट्रव्यापी सशस्त्र संघर्षाचा बिगुल वाजविला. मंगल पांडे, नानासाहेब पेशवे, कुंवर सिंह, तात्या टोपे, झांसीची राणी लक्ष्मीबाई, बहादुर शाह जफर यांसारख्या शेकडो वीर योद्ध्यांनी हत्यार उचलले. संपूर्ण देशात एकच राष्ट्रमंत्र उद्गारल्या जाऊ लागला, ‘मारो फिरंगी को’. विदेशी साम्राज्याच्या विरोधात घडलेल्या या महासंग्रामाने भविष्यात होणाऱ्या महाक्रांतीचा पाया रचला. भारतात मूळ रोवणाऱ्या ब्रिटीश साम्राज्यवाद्यांच्या छातीवर हा पहिला सशस्त्र प्रहार होता. 

इ.स. १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाचा खोलवर जाऊन अभ्यास केल्यावर स्पष्ट होते, कि ही एक ‘राष्ट्रव्यापी सशस्त्र संघर्ष’ म्हणून भारताची राष्ट्रीय ओळख तसेच सनातन संस्कृतीबद्दल जागृती घडवून आणणारी घटना आहे. या संग्रामाला ‘सांस्कृतिक राष्ट्रवादाचा उठाव’ असे देखील म्हणता येईल. वास्तविक पाहतां; गेल्या एक हजार वर्षांपासून सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या (हिंदुत्व) सुरक्षा आणि स्वातंत्र्यासाठी लढल्या गेलेल्या संग्रामाची एक महत्त्वपूर्ण संबंधित संरचना म्हणजे १८५७चे महायुद्ध.

एकंदरित; १९वें शतक सुरू होताच ईसाई पादरींनी सत्तेचा निरंकुश आधार घेत आपल्या देशाच्या प्रत्येक भागात साम-दाम-दंड-भेद या स्वरुपात ईसाईकरणाचे जे अभियान सुरू केले, आणि त्याला प्रतिकार-स्वरुपात भारतातील हिंदुत्ववाद्यांनी जे सुधारणा-आंदोलन सुरू केले; हेच आंदेलन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाची चैतन्यस्वरूप प्रेरणा बनून सशस्त्र संग्रामाच्या रूपाने पुढे आले.

या महासंग्रामाचा मुख्य उद्देश; भारतातून इंग्रज शासकांना पळवून लावून ‘स्वधर्माची’ रक्षा करत ‘स्वराज्य’ स्थापन करणे, हा होता. इ.स. १८५७च्या अगोदर सत्तेच्या संरक्षणासाठी कट्टर ईसाई पादरींनी सरकारी कर्मचाऱ्यांसोबत मिळून, ईसाईत्व थोपवण्यासाठी अनेक प्रकारच्या अनैतिक तसेच अमानवी प्रयोगांचा उपयोग करण्यास सुरूवात केली.

सरकारी शाळांमध्ये हिंदू महापुरुष आणि देवी-देवतांचे भेकड व तथाकथित चरित्र शिकवल्या जाऊ लागले. लष्करात सुद्धा ईसाई पंथानुसार प्रक्रिया-पद्धती स्वीकारण्यास सुरूवात झाली. सरकारी नोकरीमध्ये पक्षपातीपणा आणि भ्रष्टाचार देखील आपली सीमा ओलांडू लागले, इथपर्यंत; कि कोर्ट-कचेरीत सुद्धा इंग्रजी भाषा तसेच ईसाई पंथाच्या कायदा-तरतूदी, शिवाय चालीरीतींना प्राथमिकता दिल्या जाऊ लागली. धर्मपरिवर्तनासाठी लोकांना बंधनात अडकवल्या जाऊ लागले. ईसाई पादरींनी सत्तेचा आधार घेऊन हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर जखमा कोरण्याच्या कामाला गती दिली. हिंदूंना ईसाई बनविण्यासाठी सरकारी मालमत्ता खुली करण्यात आली. इंग्रजांना खूप लवकर लक्षात आले, कि हिंदूंच्या प्रेरणा-केंद्रांवर, वेदांवर, रामायण-महाभारतावर, गीतेवर तसेच अन्य धार्मिक ग्रंथांवर नकारात्मक टिप्पणी केल्यास बहुतांश हिंदूंच्या श्रद्धेला इजा पोहचवल्या जाऊ शकते.

प्रशासनाच्या छत्रछायेखाली ईसाई पादरींनी साम-दाम-दंड-भेद यांचा अवलंब करून सर्व प्रकारच्या साधनांचा उपयोग करत, ग्रामीण वस्ती, वनवासी व गोर-गरीब हिंदूंच्या सगळ्या वर्गांमध्ये जाऊन धर्मपरिवर्तनासाठी लोकांवर दडपण आणणाऱ्या प्रक्रियेला युद्ध स्तरावर थोपवण्यास सुरूवात केली. इंग्रजांना आता कळून चुकले होते, कि जर सर्व भारतीय ईसाई बनले, तर या भूमीचा सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रवाद नष्ट होईल. अशातच ईसाई पादरींनी मुस्लिम समाजाच्या देखील धार्मिक सिद्धांतांना इजा पोहचवण्यास सुरूवात केली. 

हेच कारण होते, कि जेव्हा १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामात योद्ध्यांनी ‘जंग-ए-आज़ादी’ची घोषणा केली, तेव्हा बहुतांश भारतीय समाजाने एकजूट होऊन यात सहभाग घेतला. काही इतिहासकार; इंग्रजांद्वारे हिंदू सैनिकांना गौमांस असलेल्या काडतूस देणाऱ्या प्रक्रियेलाच या युद्धाचे कारण म्हणून सांगतात. जर हीच बाब असली असती, तर सरकारद्वारे असे काडतूस न बनवण्याच्या निर्णयानंतर संघर्ष थांबायला हवा होता. या युद्धाचे सर्व सेनापती, तात्या टोपे, झांसीची रानी, नाना फडणवीस, मौलवी अजीमुल्ला खान, कुंवर सिंह तसेच बहादुर शाह जफर इत्यादी योद्धे, गायीच्या काडतूसबंदीनंतर शांत झाले असते.

इंग्रजांनी या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना ‘फितुरी तत्वाचे’ संबोधून संपूर्ण महासंग्रामाला लपवून ठेवण्याचे प्रयत्न केले, मात्र हेही एक ध्रुवसत्य आहे, कि याच सेनापतींनी संपूर्ण भारताला एका युद्धस्थळाच्या स्वरूपात बदलविले. हे थेट राजसत्ता आणि लोकसत्ता यांमधील युद्ध होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या ‘१८५७चा स्वातंत्र्यसंग्राम’ या प्रसिद्ध ग्रंथात लिहिले आहे, कि या महत्संघर्षात चार कोटींहून जास्त लोकांनी प्रत्यक्ष स्वरूपात सहभाग नोंदविला. जवळपास पाच लाख भारतीयांनी बलिदान दिले आणि यामुळे संपूर्ण देशाचे एक लाख वर्गमैल क्षेत्र प्रभावित झाले. इंग्रजांनी भारताच्या सनातन संस्कृतीला संपविण्याकरिता जे अभियान सुरू केले होते, त्यामुळे भारतातील जनता पेटून उठली होती.

हा संघर्ष म्हणजे इंग्रजांविरुद्ध थेट कार्रवाई होती. या संग्रामाला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याकरिता एक गावातून दुसऱ्या गावात पोळ्या पोहोचवणे, गुलाबाचे फूल संदेश-स्वरूपात पोहचवणे, प्रत्येक लष्कर छावणीपर्यंत कमळाचे फूल पाठवून सैनिकांना इंग्रजांबरोबर खुली फितुरी करण्याचे संदेश देणे, अशा अत्यंत सामान्य गतिविधींच्या माध्यमातून संपूर्ण देशाला एकत्रपणे जोडण्यात आले.

याच प्रकारे तीर्थयात्रांचे आयोजन करून प्रत्येक देशवासियांना हत्यारबद्ध होण्याचे आदेश देण्यात आले. एवढेच नव्हे; तर स्वदेशी राजा आणि विदेशी शक्तींसोबत संपर्क प्रस्थापित केले गेले. या संग्रामाच्या युद्धनीतीत; सैनिकी छावणीत विद्रोह पसरवणे, शस्त्रागारांवर ताबा मिळवणे, इंग्रज अधिकाऱ्यांना समाप्त करणे, सरकारी मालमत्ता लूटून कारागृहातील बंदिस्त भारतीय कैद्यांना बळजबरीने सोडवून आणणे, अशा थेट कार्रवाईंचा समावेश होता.

या प्रकारच्या सशस्त्र हालचालींचा त्वरित आणि थेट परिणाम संपूर्ण भारतवर्षावर (अफगानिस्तान, भूटान, बलुचिस्तान पर्यंत) झाला. या महासंग्रामात भारताच्या प्रत्येक जाती, पंथ, संप्रदाय, क्षेत्र आणि भाषा-भाषिकांनी पूर्ण ताकदीने सहभाग घेतला. शिवाय; हा केवळ सैनिकांमधील विद्रोहाबाबतीत नसून देशातील समग्र जनतेचा संघर्ष होता. 

स्पष्ट आहे, कि जेव्हा संपूर्ण भारतवर्ष ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधात शस्त्र घेऊन एकजूट झाले, तेव्हा या राष्ट्रीय जागृतीचा उद्देशच; भारताला इंग्रजांच्या तावडीतून सोडवून पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करणे; हा होता आणि म्हणूनच या राष्ट्रव्यापी संघर्षाला ‘स्वातंत्र्यसंग्राम’ म्हटले गेले. हेच मुळात इंग्रजांना सहन झाले नाही.
हेही वाचा : अमृत महोत्सव लेखनमाला : “दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल?”

किंबहुना; अनेक ईसाई, साम्यवादी तसेच इंग्रजभक्त इतिहासकारांनी या युगांतकारी स्वातंत्र्यसंग्रामाला मोजके आणि उद्ध्वस्त राजे-राजवाड्यांची अव्यवस्थित फितुरी म्हटले आहे. भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरलेल्या या संघटीत व शक्तीमान राष्ट्रीय संघर्षाला नकार देऊन, त्याला केवळ काही सैनिकांचा विद्रोह घोषित करण्यामागे असंख्य कारणे होती. इंग्रज साम्राज्यवाद्यांची प्रतिष्ठा वाचविणे, आपल्या विरुद्ध संघटीत होणाऱ्या भारतीयांना निरुत्साही बनविणे, ब्रिटीश सैनिकांचे मनोबल वाढविणे आणि विदेशात भारत तसेच भारतीयांना अशक्त व असंघटीत सिद्ध करणे, इत्यादी उद्देशांनी प्रेरित असलेल्या अनेक इतिहासकारांनी कित्येक तथाकथित ग्रंथ रचले. या ग्रंथांमध्ये सत्य तसेच तथ्यांना अमानुषपणे दुजोरा देत, स्वातंत्र्यसंग्रामातील सेनापतींना महत्वाकांक्षी, सत्तापिपासू आणि धन-कुबेर इथपर्यंत संबोधित करण्यात आले.

या प्रचंड देशव्यापी स्वातंत्र्यसंग्रामाला बदनाम करण्याची साम्राज्यवादी चाल काही वर्षांनंतर लयाला गेली. भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांनी लंडनमध्येच एक ५५० पानीं ‘१८५७चा स्वातंत्र्यसंग्राम’ हे पुस्तक लिहून या संघर्षाचे सत्य जगासमोर आणले. या पुस्तकात स्वातंत्र्यसंग्रामातील सेनानायकांचे युद्ध कौशल, योजनाबद्ध लोकसंग्रह, सशस्त्र एकत्रीकरण, गावा-गावांपर्यंत पोहचणारी युद्धनीती आणि इंग्रजांच्या सैनिकी छावण्यांवर भीषण आक्रमणांचे वर्णन पुराव्यांसहीत करण्यात आले आहे. 

इ.स. १९०७ मध्ये इंग्रजांनी लंडनमध्ये १८५७चे ५०वें वर्ष आपल्या विजय-दिवसाच्या स्वरूपात साजरा केले. अनेक ब्रिटीश पत्रकारांनी इंग्रजांच्या पराक्रमाचे गोडवे गात, भारताच्या महान स्वातंत्र्यसैनिकांना भ्याड व स्वार्थी म्हणून संबोधले. आपल्या सेनेच्या स्तुतीचे बांध बांधत इंग्रज लोक खरंतर आपल्या खालावलेल्या प्रतिष्ठेला वाचवण्याचे प्रयत्न करतांना दिसत होते. या पत्रकारांनी झांसीची राणी तसेच नानासाहेब यांसारख्या वीर सेनापतींचा दहशतवादी व दोषी असाही उल्लेख केला.

त्यावेळी लंडनमध्ये विद्यार्थीदशेत राहणाऱ्या भारतीय युवकांनी आपल्या सेनापतींच्या अपमानाला उत्तर देण्यासाठी १०मे रोजी स्वातंत्र्यसंग्रामाच्या ५०व्या वर्षानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामातील सत्य समग्र विश्वाच्या पुढे आणून त्यावर प्रकाश टाकला. भारतीय युवकांनी मोर्च्यांचे आयोजन करून पत्रके वाटली, ज्यांमध्ये भारतावर राबविल्या जात असलेल्या हुकुमशाहीचे विस्तारपूर्वक वर्णन केलेले होते. भारतीय राष्ट्रवादाच्या जागृतीची सुरूवात ब्रिटेनमधून झाली आणि भारतीय युवक सांस्कृतिक राष्ट्रवाद समजावून सांगण्यासाठी तत्पर झाले.

इ.स. १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाचा सर्वात मोठा परिणाम असा झाला, कि भारतीयांमध्ये ‘स्वधर्म रक्षा’, ‘राष्ट्राचे स्वातंत्र्य’, ‘विधर्मीयांचे शासन’ या विषयांवर जोरदार चर्चा होऊ लागली. या स्वातंत्र्यसंग्रामाचे मूळ म्हणजे ‘धर्म वाचविणे’ हे होते. ईसाई पादरींद्वारे भारताच्या सनातन संस्कृतीला संपविण्यासाठी जे षड्यंत्र रचले जात होते, त्याविरोधात संपूर्ण देश उभा राहिला. याआधी सुद्धा १८०६ मध्ये वेल्लूरमधील जो सैनिकांमध्ये विद्रोह निर्माण झाला, त्यामागे देखील भारतीयांच्या धर्मप्रणालीत ईसाई पादरींचा हस्तक्षेप; हेच कारण होते.

१८५७ मध्ये झालेल्या सशस्त्र स्वातंत्र्यसंग्रामाला इंग्रजांनी आपल्या कुटील राजकारण, प्रबळ सैन्यशक्ती, क्रूर दमनचक्र व अमानवी अत्याचाराद्वारे दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र राजनैतिक तसेच सैन्यदृष्टीतून भारतीय स्वातंत्र्यसेनानी भलेही पराभूत झाले असतील, तरीही ते भविष्यात होणाऱ्या सशस्त्र क्रांती व राष्ट्रभक्त क्रांतिकारकांना क्रांतिकारी संदेश देण्यात यशस्वी झाले. भारताच्या राष्ट्रीय चैतन्याने पुन्हा कूस बदलली आणि देशभरातून विदेशी राजवटीला उपटून फेकण्याचे प्रयत्न सुरू झाले, जे १९४७ पर्यंत सातत्याने  चालत राहिले.

क्रमश:

– नरेंद्र सहगल
पूर्व संघप्रचारक, लेखक, पत्रकार.

मराठी अनुवाद – अविनाश काठवटे