जळगाव लाईव्ह न्यूज। १८ ऑगस्ट २०२३। महाराष्ट्रातील अमरावतीच्या युवा तिरंदाज तुषार शेळकेने पॅरिसमध्ये आयोजित तिरंदाजीच्या वर्ल्डकप स्टेज ४ मध्ये अचूकपणे पदकाचे लक्ष्य भेदले. त्याच्या लक्षवेधी कामगिरीतून भारतीय संघ रिकर्व्हच्या सांघिक कांस्यपदकाचा मानकरी ठरला. तुषार शेळकेने आपले सहकारी धीरज बोम्मादेवारा आणि अतानू दाससोबत सांघिक कांस्य पदकाची कमाई केली. भारतीय पुरुष संघाने गुरुवारी कांस्य पदकाच्या प्लेऑफ मध्येच स्पेन टीमचा पराभव केला.
भारताने ६-२ अशा फरकाने एक तर्फी विजयाची नोंद केली. यासह भारतीय पुरुष संघ पदक विजेता ठरला. भारताला दोन कांस्यपदक मिळाले असून महिला संघ देखील चमकला आहे. झारखंडच्या अंकिता भगतने दर्जेदार कामगिरीची लय कायम ठेवत भजन कौर, सिमरनजित कौर सोबत महिला गटात भारताला कांस्यपदक जिंकून दिले.
भारतीय पुरुष संघ आणि महिला संघाने तिसरे स्थान पटकावले. धीरज बोम्मादेवरा, अतानु दास आणि तुषार शेळके यांच्या भारतीय पुरुषांच्या रिकर्व्ह संघाने आंद्रेस तामिनो, युन सांचेझ आणि पाब्लो आचा यांच्या स्पेनच्या संघाचा 6-2 (54-56, 57-55, 56-54, 57-57) असा पराभव करत कांस्यपदक पटकावले.
.