⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

आयपीएल खेळत असलेल्या ‘या’ गोलंदाजांमध्ये आहे पर्पल कॅपची चुरस

जळगाव लाईव्ह न्यूज ।पर्पल कॅपची चुरस । आयपीएल सुरु झाल म्हणजे ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण या स्पर्धेत त्या खेळाडूंना दिलेला मान असतो. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. यंदा पर्पल कॅप हि युझवेन्द्र चहलकडे आहे.

पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे. त्याने सर्वाधिक 26 विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानी वानिंदू हसरंगा आहे. त्याने 24 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या स्थानी कगिसो रबाडा आहे. त्याने 22 विकेट घेतल्या आहेत. तर चौथ्या स्थानी असलेल्या उमरान मलिकला धक्का देत कुलदीप यादवने आगेकूच केली आहे. कुलदीने 21 विकेट घेतल्या आहेत. तर उमरान मलिक हा पाचव्या स्थानी गेला असून त्यानेही 21 विकेट घेतल्या आहेत.

टॉप ५

युझवेंद्र चहल ज्याने 26 बळी घेतलेत
वानिंदू हसरंगा ज्याने 24 बळी घेतलेत
कागिसो रबाडा ज्याने 22 बळी घेतलेत
कुलदीप यादव ज्याने 21 बळी घेतलेत
उमरान मलिक ज्याने 21 बळी घेतलेत