जळगाव जिल्हा
भाजपाचे उमेदवार अमोल जावळेंच्या प्रचाराचा डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२४ । रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे अधिकृत उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या निवडणूक प्रचाराचा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी केंद्रीय मंत्री ना. रक्षा खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान पाटील, डॉ. कुंदन फेगडे, डॉ. राजेंद्र फडके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शरद जिवराम महाजन, भरत महाजन, शैलेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते.