---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र “प्रदेश सचिव” पदी अमित दिलीप सोळुंके यांची नियुक्ती…

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज। १८ ऑगस्ट २०२३। दि. १२ ॲागस्ट रोजी भाजपा प्रदेश कार्यालय नरिमन पॅाईंट, मुंबई येथे पार पडलेल्या भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रभारी मा. श्री. विक्रांतजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. राहुलजी लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव येथील श्री. अमित दिलीप सोळुंके यांची भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीस स्वयंसेवक संघ ते भाजपा युवा मोर्चात कार्य करणार्या एका आदिवासी कोळी तरूणाला प्रदेश स्तरावर कार्य करण्याची जबाबदारी व संधी देवून पक्षाने गौरव केल्याची भावना समाज मनात या निमित्ताने निर्माण झाली आहे.

image 7 jpg webp webp

सदर नियुक्ती बद्दल ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना. श्री. गिरीषभाऊ महाजन, माजी खासदार व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॅा. विनयजी सहस्रबुद्धे, भाजपा प्रदेश सरचिटणीस मा. श्री. विजयजी चौधरी, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस मा. श्री. योगेशजी मैंद, आमदार श्री. सुरेश भोळे (राजूमामा), खासदार उन्मेषदादा पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार संजयजी सावकारे, आमदार मंगेशदादा चव्हाण, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष सौ. उज्जवलाताई बेंडाळे, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरजी महाराज जळकेकर, जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष श्री. अमोलजी जावळे, माजी जि प समाजकल्याण सभापती श्री. प्रभाकरआप्पा सोनवणे, केशवस्मृतीचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्रजी नन्नवरे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---