जळगाव लाईव्ह न्यूज : २६ मार्च २०२२ । रावेर तालुक्यातील चिनावल येथील अमीर हमजा शेख नदीम याने 2021 ची एमपीएससी परीक्षा नाशिक केंद्रातून पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे.
अमीर हमजा याने खिद्र उर्दू हायस्कूल, चनावळ येथून 10वी उत्तीर्ण केली. जळगावच्या अँग्लो उर्दू ज्युनिअर कॉलेजमधून 12वी उत्तीर्ण केल्यानंतर जळगावच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने स्थापत्य अभियंता पदवी मिळवली. सध्या एम.टेक (मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी) या पदवीचे शिक्षण घेत आहे.
अमीर हमजाने सांगितले की, स्वतःच्या वैयक्तिक अभ्यासातून एमपीएससी परीक्षेची तयारी केली होती.
अमीर हमजाचे वडील दिवंगत शेख नदीम हे जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेचे कर्मचारी होते. त्यांचे 2019 मध्ये निधन झाले. आमीर हमजाने मुलाखतीत यश मिळावे अशी प्रार्थना केली आहे.