Amalner News-जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । अमळनेर येथील तरुणाने पैशांच्या तगाद्याला त्रस होवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश ठाकूरदास पंजवाणी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर जितेंद्र चौधरी (पारोळा) व रुग्णवाहिका चालक महेश सैंदाणे (रा.जानवे, ता.अमळनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मयत दिनेश पंजवाणी यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहेत. त्यात, माझ्या मुलाचे दोन वर्षाचे शिक्षण बाकी असून माझ्या मित्रांनो आपण शक्य तेवढी मदत करावी, असे त्यात नमूद आहे. पैशांचा तगादा लावणार्या दोन जणांची नावेदेखील या चिठ्ठीत लिहिली आहेत. मैं दिनेश पंजवाणी अपने होश आवास मे लिख रहा हूँ. मैं बेरोजगार हो गया हूँ, मुझे कोई काम नही मिल रहा है और शर्म की बात है की मेरी बीबी काम करके घर चलायेगी, मुझे दो लोग पैसे के लिये बहोत तंग कर रहे है…जितू चौधरी, महेश सैंदाणे ये लोग मुझे धमकी दे रहे है और मेरे पास घर चलानेको पैसे नही है, ये दोनों को कहासे दु, इसलिए तंग होकर मैं आत्महत्या कर रहा हूँ, ये दोनो के मोबाईल नंबर मेरे मोबाईल मे है, असेही चिठ्ठीत नमूद आहे.