जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२२ । अमळनेर येथील शिवारातील शेतातून एक म्हैससह दोन बैल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकणारी येथील पोलिसांत अज्ञात भामट्यांविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय दगडू पाटील (वय ४८, रा.डाबर बु.अमळनेर, जळगाव) व निंबा पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून त्यांच्या शेतातून दि.१ सप्टेंबर ते २ सप्टेंबरदरम्यान, कुणी तरी अज्ञात भामट्यांनी एक म्हैससह दोन बैल चोरून नेले. या प्रकरणी संजय दगडू पाटील (वय ४८, रा.डाबर बु.अमळनेर, जळगाव) यांनी पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जनार्दन पाटील करत आहेत.