जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२३ । अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत असून अशातच अमळनेरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाला ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. वारंवार झालेल्या अत्याचारातून पीडीता गर्भवती र्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला. पीडीतेने याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनंतर संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह राहायला आहे. दि.१३ जुलै ते १७ सप्टेंबर या दरम्यान संशयित आरोपी विशाल कोळी(वय २०) हा गेल्या तीन महिन्यापासून रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या घरी येवून तिच्या लहान भावाला जीवे मारण्याची धमकी देत घरात व घराबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत अत्याचार करीत होता. यातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. याप्रकरणी संशयित आरोपी विशाल कोळी याच्या विरोधात अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी.भगवान शिरसाठ हे करीत आहेत.