⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अमळनेर शहरातील ‘केले’ कुटुंबीयांचे दातृत्त्व, फार्मसी महाविद्यालयाला २५ लाखांची देणगी

अमळनेर शहरातील ‘केले’ कुटुंबीयांचे दातृत्त्व, फार्मसी महाविद्यालयाला २५ लाखांची देणगी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । अमळनेर येथील खा. शि. मंडळाच्या फार्मसी महाविद्यालयास प्रा.र.का.केले यांचे नाव देण्यात आले. यानिमित्त प्रताप महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले कुटुंबीयांतर्फे संस्थेला शुक्रवारी २५ लाखांचा धनादेश देण्यात आला.

दरम्यान, शिक्षण हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे, असे याप्रसंगी सी.ए. प्रकाश पाठक (धुळे) यांनी सांगितले. संस्थेचे पदाधिकारी व प्रमुख अतिथींना कै.प्रा.र.का. केले यांच्या पत्नी रजनी केले व कुटुंबीयांनी २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. कै.प्रा. केले हे प्रताप महाविद्यालयात सेवारत होते. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी फार्मसी महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षीय भाषणात आमदार अनिल पाटील यांनी केले कुटुंबियांचे व खान्देश शिक्षण मंडळाचे नाते अधोरेखित केले. कुटुंबपणाची जोपासना करत दातृत्वाच्या भावनेने दिलेली ही देणगी नक्कीच येणाऱ्या पिढीसाठी सत्कारणी लागेल, असे त्यांनी सांगितले.

यांची उपथिती होती 

संस्थेचे अध्यक्ष अनिल कदम, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष जितेंद्र जैन, कार्योपाध्यक्ष कल्याण पाटील, संचालक डॉ. बी.एस.पाटील, हरी वाणी, डॉ.संदेश गुजराथी, योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल, चिटणीस प्रा.डॉ.अरुण कोचर, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश शिरोडे, फार्मसीचे प्राचार्य रवींद्र माळी उपस्थित होते. संचालक नीरज अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे मुख्याध्यापक प्रतिनिधी डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सिनिअर सिटीझन क्लब, लायन्स क्लब, रोटरी क्लब, मेडीकल असोसिएशन, खा. शि. मंडळाचे माजी संचालक, माजी प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.