⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अमळनेर बस दुर्घटना : पितृछत्र हरपलेल्या ‘कोमल’च्या शिक्षणासाठी (PTA)’चा’ पुढाकार!

अमळनेर बस दुर्घटना : पितृछत्र हरपलेल्या ‘कोमल’च्या शिक्षणासाठी (PTA)’चा’ पुढाकार!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२२ । अमळनेर बस दुर्घटनेत पितृछत्र हरपलेल्या कोमल चौधरीची शैक्षणिक जबाबदारी एक सामाजिक बांधिलकी म्हणून खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेने (PTA) उचलली आहे. दरम्यान, पितृछत्र हरपलेल्या या मुलीच्या मदतीला धावून आल्याने खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेचे (PTA) जिल्हाभर कौतुक होत आहे.

अमळनेर डेपोची बस अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा असल्याने सदर डेपोची बस क्रमांक (एमएच.४०.एन.९८४८) बस ही इंदूर येथे गेली होती. तेथून परतीच्या प्रवासासाठी बस अमळनेरच्या दिशेने सकाळी ७.३० वाजता निघाली होती. खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्‍या कलघाट गावाजवळ संजय पुलावरून १८ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास नर्मदा नदीच्या पात्रात ही बस कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी होते, यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. बसमधील १३ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, तर १५ जणांना वाचविण्यात यश आले होते. मात्र, घटनेत अमळनेर येथील बस चालक प्रकाश चौधरी यांचा देखील मृत्यू झाला होता.

दरम्यान, प्रकाश चौधरी यांची कन्या कोमल चौधरी हीची 11वी व 12वी ची शैक्षणिक जबाबदारी अमळनेर कोचिंग क्लासेस संघटनेने उचललेली आहे. उपविभागीय अधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर भाग, अमळनेर यांच्या कार्यालयात क्लासेस संघटना अध्यक्ष भैय्यासाहेब मगर यांनी ही घोषणा केली. सीमा अहिरे यांच्या हस्ते कोमल चौधरी हिला शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

यावेकी कोमलचे पालक (काका) निलेश चौधरी तसेच क्लासेस संघटना (PTA) अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, फिजिक्स क्लासेसचे बढे, सुमन अकाँटन्सी व केमिस्ट्री क्लासेसचे चंदुलाल बडगुजर, योगीराज Maths क्लासेसचे शिरीष डहाळे, बायोलॉजी क्लासेसच्या सोनल जोशी, तसेच एस.टि.महामंडळाचे कर्मचारी मनोज पाटील उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह