---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

महाराष्ट्रातील राजकारणात मोठा ट्विस्ट ; राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२३ । गेल्या मागील काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीतील या फुटीला 15 दिवसही उलटले नाही तोच महाराष्ट्रातील राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ncp mla sharad pawar meet jpg webp webp

शरद पवार हे मंत्रालयासमोरीलच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आहेत. तिथेच हे मंत्री पवारांना भेटायला गेले आहेत.विशेष म्हणजे उद्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच हे नेते शरद पवार यांना भेटायला गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

---Advertisement---

हे नेते गेले भेटायला?
शरद पवार यांच्या भेटीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह सर्वच मोठे नेते गेले आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---