---Advertisement---
गुन्हे भुसावळ

अरेरे.. दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच पोलीस पोहोचले, अन्..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात चोरीचे वाढले असल्याने आता पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले असल्याचे पाहायला मिळते आहे. भुसावळ शहरात दरोड्याच्या पूर्वतयारीत असणाऱ्या टोळीला गस्तीवर असलेल्या पोलिसाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 07T103039.808 jpg webp

विजय नेरकर यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. नेरकर हे बाजारपेठ पोलिसांत पोहेस्कॉ म्हणून कार्यरत आहेत. दि. १९ रोजी रात्री नेरकर यांना भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणा नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित आरोपी सूरज भांगे, कलीम शेख, समीर शहा, गिरीश जोहरी, विजय चव्हाण हे चाकू, कुऱ्हाड, दोर व पावडर असे घातक हत्यार बाळगून दरोडा घालण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे नेरकर यांनी त्यांना कारवाईसाठी ताब्यात घेतले. मात्र, सदर संशयितांनी नेरकर यांच्या अंगावर धावून, धोक्काबुक्की व लोटालोटी करून सरकारी कर्तव्य करण्यापासून परावृत्त केले.

---Advertisement---

या प्रकरणी नेरकर यांनी बाजारपेठ पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित आरोपी सूरज भांगे, कलीम शेख, समीर शहा, गिरीश जोहरी, विजय चव्हाण अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुदर्शन वाघमारे करत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---