Amalner News-जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । अमळनेर तालुक्यातील रूधांटी येथील नूतन माध्यमिक विद्यालयात हजेरी बुकवर सह्या करण्याच्या वादातून राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
मधुकर परशुराम पवार (वय ७२,रा. गलवाडे रोड अमळनेर) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मधुकर पवार हे रूधांटी येथील नूतन माध्यमिक विद्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी मुख्यध्यापक कार्यालयात जाऊन मुख्यध्यापक रामचंद पाटील यांना गणेश गोपीचंद पाटील, स्वाती श्रीकृष्ण पाटील, प्राजक्ता सतिलाल देवरे हे शिक्षक सेवेत शाळेत वेळेवर येऊन मुलांना शिकवीत आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना शिक्षक हजेरी बुकवर सहया करू दिल्या पाहिजे, अशी विनंती केली. त्यावर मुख्यध्यापक यांनी नकार देत मी छगन विक्रम यांचे ऐकिल. तुझ्याने जे होईल ते करून घे, म्हणत अशी शिवीगाळ केली. तसेच तुला मारण्यासाठी मी त्यांना बोलवितो असे बोलून गावातील वादग्रस्त व्यक्ती छगन विक्रम पवार यांना बोलवत शिवीगाळ केली.
यावेळी लागलीच छगन विक्रम पवार यांचा मुलगा महेंद्र छगन पवार याने हिंमत रामचंद्र पाटील, छगन विक्रम पाटील, लहुदेव राम पवार, महेंद्र छगन पवार, नितीन धनराज पवार (रा. रूधांटी अमळनेर) यांना बोलावून मधुकर पवार यांना शिवीगाळ व चापटाबुक्यानी मारहाण केली. तसेच जिवेठार मारू अशी धमकी दिली. तर लहुदेव पवार याने सुरतवरून गॅग आणुन तुला मारून टाकील, अशी धमकी दिली. याप्रकरणी पाचही संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरुषोत्तम पाटील हे करीत आहेत.