जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । गेल्या कित्येक महिन्यांपासून संपावर असलेले एसटी कर्मचारी आता हळूहळू कामावर रुजू व्हायला लागले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या इशाऱ्यानंतर १ तारखेपासून ५०० पेक्षा अधिक चालक व वाहक कामावर रुजू झाले आहेत. यामुळे आता महामंडळाने फेर्या वाढल्या आहेत.
चालक व वाहक यांची कमतरता असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून एसटीच्या फेऱ्या हव्या तितक्या होत नव्हत्या मात्र १ एप्रिल पासून चालक व वाहक यांचा वाढलेला आकडा लक्षात घेता महामंडळाने फेऱ्या पुन्हा सुरू केल्या आहेत. म्हणूनच की काय अकोला-अमरावती मार्गावर ही बससेवा पुन्हा सुरू झाली आहे.
नागरिकांनी अकोला -मरावती मार्गावर प्रवास करताना बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाने केले आहे