जळगाव जिल्हा

रान बाजार वेब सिरीजवर कारवाई करा : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । रान बाजार वेब सिरीज मधून पोलीस खात्याची खालच्या पातळीत बदनामी केली जात आहे. त्यावर तात्काळ बंदी घालून रान बाजार वेब सिरीजचे निर्माता, दिग्दर्शक, लेखक, कलाकार ज्या सॉफ्टवेरवर वेब सिरीज चालू आहे. या सर्व टीम वर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जळगांव जिल्हा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

सदर क्षणाय खलनिग्रहनाय या घोष वाक्याची शपथ घेऊन देशसेवेसाठी समाजसेवेसाठी आपले जीवन झोकून देणारे खाकी मधील पोलीस हे काही मनोरंजन करण्याचा विषय नाही. पोलीस खात्याच्या खांद्यावर आणि डोक्यावर अशोकस्तंभ दिला जातो. दुर्जनांचा नाश करून समाजाला सुरक्षित ठेवण्याचे काम या पोलीस खात्याच्या खांद्यावर आहे. या राज्यातील पोलीस खात्याची बदनामी या वेबसिरीज ने चालु केली आहे. रान बाजार वेब सिरीज मध्ये अनेक सिन मध्ये पोलिसांचा संबंध दाखवला आहे. त्या सिन मध्ये पोलीस अमलदाराला खालच्या दर्जात दाखवले आहे. घाण घाण शिव्या पोलिसांना देण्यात आले आहे. यामुळे समाजाचा पोलीस खात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. वेबसिरीज मध्ये ज्यात वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना पोलीस उचलून आणतात. तो सिन पोलीस स्टेशन मध्ये दाखवला आहे. त्यात खूप खालच्या पातळी वर पोलिसांना दाखवले आहे. यामुळे पोलिसांची प्रतीमा समाजात मालिन झाली आहे. अश्या सिरीज, सिनेमा यांच्यावर आताच आळा घातला नाही तर हे लोक पोलीस लाईन मध्ये गैरवापर दाखवतील. असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी संघटनेचे जळगांव संपर्क प्रमुख कुणाल मोरे, जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे, आरिफ पिंजरी, अकील शेख, कन्हैया मोरे, भूषण सुरळकर, चेतन निंबोळकर, लकी राजपूत आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button