जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२४ । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार असून आज दुपारी साडेतीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पत्रकार घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. यामुळे आता राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये जागावाटप लवकरच जाहीर होऊ शकते. त्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडून पहिली यादी तयार झाली आहे. अजित पवार यांनी सोबत आलेल्या सर्व आमदारांना पुन्हा तिकिट देण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार आहे.
अजित पवार गटाची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे. ५० उमेदवारांची पहिली यादी असेल, असे समजलेय. विद्यमान आमदारांची ४० नावांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे. साथ सोडणाऱ्या तीन जणांना वगळण्यात येणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत नावांची घोषणा होणार आहे. तीन जणांमध्ये दीपक चव्हाण, बबनदादा शिंदे आणि राजेंद्र शिंगाणे यांचा समावेश आहे.
अजित पवार यांच्या गटात किती आमदार?
1.सरोज अहिरे
2.धर्माबाबा आत्राम
3.बाळासाहेब अजबे
4.राजू कारेमोरे
5.आशुतोष काळे
6.माणिकराव कोकाटे
7.मनोहर चांद्रिकेपुरे
8.दीपक चव्हाण (साथ सोडली, शरद पवारांकडे)
9.संग्राम जगताप
10.मकरंद पाटील
11.नरहरी झिरवाळ
12.सुनील टिंगरे
13.अदिती तटकरे
14.चेतन तुपे
15.दौलत दरोडा
16.राजू नवघरे
17.इंद्रनील नाईक
18.मानसिंग नाईक
19.शेखर निकम
20.अजित पवार
21.नितीन पवार
22.बाबासाहेब पाटील
23.अनिल पाटील
24.राजेश पाटील
25.दिलीप बनकर
26.अण्णा बनसोडे
27.संजय बनसोडे
28.अतुल बेनके
29.दत्तात्रय भरणे
30.छगन भुजबळ
31.यशवंत माने
32.धनंजय मुंडे
33.हसन मुश्रीफ
34.दिलीप मोहिते
35.किरण लहामटे
36.दिलीप वळसे
37.राजेंद्र शिंगणे (साथ सोडली, भूमिका स्पष्ट)
38.बबनराव शिंदे (साथ सोडली, भूमिका स्पष्ट)
39.सुनील शेळके
40.प्रकाश सोळंके