महाराष्ट्रराजकारण

पहाटेच्या शपथविधीबाबत पुस्तकात शरद पवारांचा खळबळजनक खुलासा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२३ । 2019 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटे एक मोठी खळबळ उडवून देणारी घटना घडली होती. ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस भल्या पहाटे एकत्र येऊन सरकार स्थापन केले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र याबाबत शरद पवार यांनी कधीच कोणती प्रतिक्रिया दिली नाही. परंतु आता शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे.

अजित पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ हा माझ्यासाठी मोठा धक्का होता, असं शरद पवार यांनी या पुस्तकात नमूद केलं आहे. तसंच तेव्हा घडलेला संपूर्ण घटनाक्रमही पवार यांनी पुस्तकातून उलगडला आहे.

शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे आज प्रकाश होणार आहे. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. या पुस्तकामुळे पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे.

पहाटेच्या शपथविधीबाबत काय म्हटलं आहे पुस्तकात?
‘विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय हालचाली वेगानं घडत होत्या. सरकारस्थापनेचा मार्ग प्रशस्त झाला असतानाच एक अभूतपूर्व वळण महाराष्ट्राच्या राजकारणात आलं. २३ नोव्हेंबरच्या सकाळी ६.३० वाजता माझ्या निवासस्थानी फोन खणखणला. राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनात पोचलेले असून, अजित पवार यांनी भाजपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजितदादा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती मला देण्यात आली. तो मोठा धक्का होता. ‘महाविकास आघाडी’चं सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार असतानाच हे घडणं, म्हणजे आमच्या सर्वांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह होतं,’ असं म्हणत शरद पवार यांनी पहाटेचा शपथविधी आपल्या परवानगीशिवाय झाला असल्याचा दावा केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button