अहिराणी गाण्याची धूम : रामेश्वर कॉलनीतील तरुणाने चित्रित केलेले सॉंग रिलीज
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । जिल्ह्यात सध्या अहिराणी गाण्यांची धुम असून नवीन गाणे बाजारात येत आहेत. शहरातील रामेश्वर काॅलनीतील धडपड्या तरुण सनी पाटील याच्या पहिल्या अहिराणी व्हिडीओ गाण्याचे चित्रीकरण नुकतेच झाले असून ते युट्युबवर रिलीज करण्यात आले आहे.
‘मना मांगली गली नी पोर’ हे गाण्याचे बोल असून उद्घाटनप्रसंगी जळगाव मनपा महापौर जयश्री महाजन, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, नगरसेवक गणेश सोनवणे आदी मान्यवर मंडळी आदी उपस्थित होते. प्रसंगी गाण्याचे गीतकार कंपोझर तथा पटकथा दिग्दर्शक प्रा.रत्नाकर कोळी यांनी खान्देशी कलावंताचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला.
या गाण्यासाठी, खान्देशातील ज्येष्ठ कलावंत, तोंडाई आक्का उर्फ पैसावाली ताई फेम विद्याताई भाटिया तर अभिनेता म्हणून सनी पाटील, अभिनेत्री अमिषा थापा, रॅंचो भिरुड आणि सहअभिनेत्री म्हणून भुमी मासाळ यांनी काम पाहिले. चित्रीकरणाप्रसंगी रामेश्वर काॅलनीतील रसिक मायबाप आणि सहकारी मित्र मंडळ देखील उपस्थित होते.
गाण्याची युट्युब लिंक :
https://youtu.be/ChlEFj8SpOg