जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२२ । अहिराणी गाण्यांची सध्या जोरदार चलती असून दर पंधरवड्यात एक नवीन गाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लॉन्च केले जात आहे. अहिराणी (ahirani songs) गाण्यातील काही मोजक्या गाण्यात सर्वात वर असलेल्या ‘बबल्या ईकस केसावर फुगे’ या गाण्याने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या तीन वर्षात या गाण्याला युट्युबवर विक्रमी व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्याने २५ कोटी व्ह्यूजचा टप्पा नुकतेच पूर्ण केला असून ‘बबल्या ईकस केसावर फुगे’चे दुसरे व्हर्जन देखील प्रदर्शित झाले असून त्याला देखील उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
अहिराणी गाण्याच्या इतिहासात क्रांती आणणारे गाणे म्हणजे ‘बबल्या ईकस केसावर फुगे’ हे गाणे आहे. २८ मार्च २०१९ रोजी युट्युब प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आलेलय या गाण्याने अनेकांना अक्षरशः वेड लावले होते. सोशल मीडियात, लग्न सोहळ्यात कुठेही पहिले तर तेच गाणे कानी पडत होते. आजही या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही. तीन वर्षात या गाण्याने दोन चार नव्हे तर तब्बल २५ कोटी व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे. सचिन कुमावत यांनी सादर केलेल्या या गाण्यात कलाकार म्हणून सचिन कुमावत, अण्णा सुरवाडे, कृष्णा जोशी, बाळू वाघ, संजय सोनवणे हे आहे. गायक अण्णा सुरवाडे, संगीत सचिन कुमावत, नृत्य दिग्दर्शक समाधान निकम, कॅमेरा ऋषिकेश चौधरी, रिदम डी.जे.अभिनव, प्रोडक्शन राहुल गुजर यांचे आहे. चॅनल टीम कृष्णा जोशी, संजय सोनवणे, बाळू वाघ, अल्पेश कुमावत, ऋषी चौधरी, राहुल चौधरी, सोनू चौधरी, कुणाल थेटे, विजय बनकर, साहेबराव इंगळे यांचे सहकार्य लाभले आहे.
अहिराणी गाण्यांच्या (ahirani songs) इतिहासात ‘बबल्या ईकस केसावर फुगे’ या गाण्याने जळगाववासियांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. युट्युबला वाढणारे व्ह्यूज इतर कलाकारांना देखील प्रेरणा देत असतात. केवळ हौस म्हणून गाणे निर्मित न करता पैसे कमावण्याचे साधन म्हणून देखील खान्देशी कलाकार आता या व्यवसायाकडे पाहू लागले आहे. खान्देशातील अनेक कलाकार आपल्यातील कला जोपासून एक से बढकर एक अहिराणी सुपरहिट गाणे लॉन्च करीत असतात.