---Advertisement---
बातम्या कृषी जळगाव जिल्हा

शेती हा निसर्गाशी खेळलेला जुगार : डॉ.प्रताप जाधव

---Advertisement---

नाम फाउंडेशनतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना २५ हजाराचा धनादेश प्रदान

जळगाव लाईव्ह न्युज। २ एप्रिल २०२२ । शेती हा निसर्गाचा खेळलेला जुगार असून अवकाळी पाऊस, आवर्तन, नैसर्गिक बदल, यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असते. यामुळे आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी आत्महत्या करीत असतात. शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. शेतकरी आपल्याला भरभरून देतो नवचैतन्य, भरारी व सुखसमृद्धीची गुढी शेतकऱ्यांनी उभारावी तसेच आत्महत्या थांबाव्यात असे मत नाम फाउंडेशनचे जळगाव विभाग समन्वयक डॉक्टर प्रताप जाधव यांनी केले.

dhanadesh 1

नाम फाउंडेशन पुणे तर्फे गणपती नगरातील रोटरी हॉल येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १९५ कुटुंबांना आज दिनांक २ एप्रिल रोजी प्रत्येकी २५ हजार रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर जाधव हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, डॉक्टर प्रताप जाधव, निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटील, के.के. कॅन्सचे रजनीकांत कोठारी, संजय शहा, डॉक्टर रितेश पाटील, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात गुढी पूजनाने करण्यात आली.

---Advertisement---

पुढे बोलताना डॉक्टर जाधव यांनी सांगितले की,शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एक दुसऱ्याला सहयोग करून त्यांना संकटातून बाहेर काढण्याची गरज आहे. यासाठी नाम फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. जोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला मार्केटमध्ये जाऊन माल विकून चांगले उत्पन्न येत नाही तो पर्यंत चांगले उत्पन्न म्हणता येत नाही. नवीन वर्षात शेतकरी आत्महत्या थांबाव्यात अशी प्रार्थना देखील त्यांनी यावेळी केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर रितेश पाटील यांनी केले. यावेळी कार्यक्रमास अमित जगताप,क्षितिज भालेराव, संग्राम सूर्यवंशी, डॉक्टर पार्थ जाधव,केवल शहा, गणेश पाटील, पुनम पवार, मयुरी ठाकूर, तेजल पाटील, वैष्णवी नवले, प्रीती आहेर, आदित्य इंगळे, संदीप नवले, तुषार परिहार, भटू ठाकूर आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमादरम्यान शेतकरी कुटुंबियांना काळ्या गव्हाचे पीठ तसेच 25 हजाराचा धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी जिल्हाभरातील शेतकरी कुटुंबीय उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---