⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

Jalgaon : तुमच्या मुलीला कोणी.., धक्काबुक्कीनंतर आर्चीने चाहत्याला सुनावले खडे बोल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२४ । जळगावातील महासांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमास सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने हजेरी लावली. यावेळी रिंकू राजगुरुने सैराट चित्रपटातील डायलॉग म्हणत तसेच गाण्यांवर नृत्य करत जळगावकरांची मने जिंकली. परंतु त्या कार्यक्रमास अतिउत्साही लोकांनी गालबोट लावले. या कार्यक्रमातून बाहेर पडताना ती एका चाहत्यावर चांगलीच भडकली.

नेमकं काय घडलं?
जळगाव येथे शासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सव आयोजित केला होता. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमास अभिनेत्री रिंकू राजगुरु हिची विशेष उपस्थिती होती. रिंकू राजगुरू हिला बघण्यासाठी जळगावकरांनी महासंस्कृती महोत्सवात मोठी गर्दी केली होती. यावेळी रिंकूने ‘सैराट’मधील तिचा लोकप्रिय डायलॉगसुद्धा म्हणून दाखवला होता. विशेष म्हणजे हा डायलॉग तिने खान्देशी भाषेत म्हणून दाखवला. यावेळी चाहत्यांनी एकच कल्ला केला.

या कार्यक्रमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला भेटण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी केली. गर्दीत रिंकू राजगुरु हिला धक्काबुक्की झाल्यानंतर तिचा संताप आनावर झाला. यावेळी आर्ची चाहत्यांवर जाम भडकली. तुमच्या मुलीला कोणी धक्काबुक्की केल्यास तुम्हाला चालेल का? अशा शब्दात रिंकू राजगुरूने चाहत्यांना खडेबोल सुनावले.