⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | गुन्हे | भादलीनंतर चोरट्यांकडून शिरसोली टार्गेट, एकाच रात्रीत सहा घरे फोडली

भादलीनंतर चोरट्यांकडून शिरसोली टार्गेट, एकाच रात्रीत सहा घरे फोडली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । सध्या ग्रामीण भागात चोरट्यानी चांगलाच धुमाकूळ घातलाय, भादली येथे तब्बल सात घरात चोरटयांनी डल्ला मारल्याची घटना ताजी असताना पुन्हा शहराच्या जवळच असलेल्या शिरसोली येथे एकाच रात्री तब्बल सहा घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडीस आली आहे. या प्रकरणी आज शुक्रवारी दि. १० रोजी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

शिरसोली येथील धनश्री हॉटेल जवळील प्लॉट भागात मध्यरात्री चोरट्यांनी बंद घरे असल्याचे संधी साधून एकाच रात्री तब्बल ६ बंद घरे फोडून रोकडसह लाखो रूपयांचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार आज दि. १० रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. यामध्ये राजेंद्र रामा बारी यांच्या घरातून १५ हजार रुपयांची रोकड, महेंद्र रामदास चव्हाण यांच्या घरातून ५० हजार रुपये रोख व ६२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने, योगेश भिमराव देशमुख यांच्या घरातून ३५ हजार रूपये किंमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सपना रविंद्र गोंधळे यांच्या घरातून १० हजार रूपये किंमतीचे ३ गॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तर सुधीर भावराव पाटील आणि पुनमचंद विठ्ठल देवरे यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.

अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्यासह श्वान पथक, ठसे तज्ञ पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी घर मालकांशी संवाद साधुन माहिती घेण्यात आली. याप्रकरणी महेंद्र रामदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह