Jalgaon Temperature : पावसाने पाठ फिरवताच उकाडा वाढला ; जळगावात हिवाळ्याचे कधी होणार आगमन?
![tapman | Jalgaon Live News](https://jalgaonlive.news/wp-content/uploads/2023/06/tapman-jpg-webp-webp.webp)
जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२३ । राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने पून्हा एकदा विश्रांती घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातही मागील गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असून, आता आगामी आठवडाभर तरी जिल्ह्यात पावसाची शक्यता कमीच असून यातच तापमान वाढीसह उकाडा वाढला आहे.
सध्या शहरातील तापमानाचा पारा ३३ ते ३४ अंशावर जात असून येत्या काही दिवसांत शहरातील तापमानाचा पारा ३५ अंशाचा पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काही दिवस जळगावकरांना घामाच्या धारा लावणारे ठरणार आहेत. मात्र, हिवाळ्याचे लवकरच आगमन होणार आहे. यामुळे उकाड्यातून दिलासा मिळू शकतो.
जळगाव जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलै महिन्यात पाऊस झाला होता. त्या पावसाच्या भरोसे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होती. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने चांगलीच ओढ दिल्याने खरिपाची पिके करपू लागली होती. परंतु सप्टेंबर महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला. त्यात जिल्ह्यात लहान मोठ्या धरणांमधील जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.
मात्र मागील गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. सध्या बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात देखील कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत असून जळगाव जिल्ह्यात मात्र पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. त्यात जिल्ह्यातून ५ ऑक्टोबरनंतर मान्सूनदेखील माघारी फिरणार असल्याने आता जिल्ह्यातील पावसाळा जवळपास संपला आहे.
दरम्यान, आगामी काही दिवस आता तापमानात वाढ होऊन उकाडा वाढणार आहे. मान्सून जसजसा माघार घेतो तसतसे तापमान वाढते आणि आर्द्रता कमी होते. हा परिणाम ऑक्टोबर महिन्यात दिसून येणार असून, आगामी काही दिवसांत शहरातील तापमानाचा पारा ३५ अंशाचा पुढे जाण्याची शक्यता
हिवाळ्याचे लवकरच होणार आगमन
यंदा हिमालयासह उत्तर भारतातून मान्सून लवकरच माघारी फिरला आहे. त्यामुळे हिमालयातील काही राज्यांमध्ये लवकरच बर्फवृष्टीला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय होऊन हिवाळ्याचे आगमन होऊ शकते. दरम्यान, जर बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात यंदा वादळांची स्थिती निर्माण झाली. नाही, तर यंदा थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.