⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

आयटीआयचे शिक्षण घेत तो गुन्हेगारांच्या नादी लागला, मौजेसाठी दुचाकी चोरी करू लागला

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२२ । हल्लीचे पोरं केव्हा काय करतील हे सांगणे कठीण आहे. एका आयटीआयचे शिक्षण घेणारा अल्पवयीन मुलगा गुन्हेगाऱ्यांच्या नादी लागून मौज मौजेसाठी दुचारी चोरी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, त्याच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी ४ दुचाकी हस्तगत केल्या असून मुख्य आरोपी पसार झाला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी जिल्ह्यात जास्त प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने गुन्ह उघडकीचे आदेश किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना दिल्याने त्यांनी त्यांचे पथकातील पोह जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, विजय पाटील, प्रितम पाटील, नितीन बावीस्कर, अविनाश देवरे, सचिन महाजन, भारत पाटील सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांचे पथक नेमण्यात आले होते.

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना शहरातील हरिविठ्ठल भागातील गुन्हेगार एका अल्पवयीन मुलाचा साहाय्याने दुचाकी चोरी करून त्याच्या मार्फत विल्हेवाट लावत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सदर पथकांना सखोल तपास करून पुढील कारवाईसाठी रवाना केले. पथकाने हरी विठ्ठल नगर भागात जावून शोध घेतला असता रेकॉर्ड वरील आरोपी हा फरार झाला असून अल्पवयीन बालक मिळून आल्याने त्याचे कडून ४ मोटार सायकल ताब्यात घेण्यात आल्या. त्यात जिल्हापेठ पो. स्टे CCTNS गु.र.नं. ४८६/२०२२, एरंडोल पो.स्टे CCTNS गु.र.नं. १४० / २०२२, अमळनेर पो.स्टे CCTNS गु.र.नं. ३३७/२०२२, रावेर पो.स्टे CCTNS गु.र.नं. ९८८ / २०२२ हे उघड झाले आहेत. सदरच्या मोटार सायकल ह्या पुढील कारवाई करीता जिल्हापेठ पो.स्टे. ला जमा करण्यात आल्या आहेत.