---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

शरद पवारांपाठोपाठ सुप्रिया सुळेंनी घेतली खडसेंची भेट

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : ६ नोव्हेंबर २०२३ : राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. सकाळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हॉस्पिटलमध्ये जावून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. आता शरद पवार यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे देखील देखील रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांनी एकनाथ खडसेंशी चर्चा केली. त्यानंतर पत्नी मंदाकीनी खडसे, कन्या शारदा खडसे, एकनाथ खडसे यांचे खासगी डॉक्टर डॉ.अभिषेक ठाकुर यांच्याकडून खडसेंच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेतली. पहा व्हिडीओ

khadse 2 jpg webp

छातीत दुखत असल्याने एकनाथ खडसे यांना शनिवारी जळगाव येथे एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात होते. पुढीच उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्यात आले आहे. रात्री त्यांना जळगाव विमानतळावरुन एअर ॲम्बूलन्सने मुंबईला नेत्यात आले. आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी रुग्णालयात जावून खडसेंची भेट घेत प्रकृतीची चौकशी केली.

---Advertisement---

त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जावून खडसेंची भेट घेतली. यावेळी मंदाकीनी खडसे व एकनाथ खडसे यांचे खासगी डॅाक्टर डॉ. अभिषेक ठाकुर यांनी सुप्रिया सुळेंना तब्येतीविषयी माहिती दिली. एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असून कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, असे आवाहन खडसे कुटूंबियांकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---