जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । गेल्या दोन दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली होती. त्यामुळे ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला होता. मात्र गुरुवार दि.१८ रोजी सोने-चांदीचे दरात पुन्हा वाढ झाली आहे. सोन्याचे दर २६० रुपयांनी तर चांदीच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे.
सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे सोने-चांदीची मागणी पुन्हा वाढली आहे. दि.१६ नोव्हेंबर रोजी सोने २० रुपयांनी तर चांदी ६०० रूपयांनी कमी झाली होती. त्यानंतर दि.१७ रोजी सोन्याचे दर २६० रुपयांनी तर चांदीचे दर ३३० रुपयांनी घसरले होते. त्यामुळे सोने प्रति १० ग्रॅमसाठी ५०,१९० रुपयांवर तर चांदीचे दर प्रति किलोसाठी ६७,७९० रुपयांवर पोहोचले होते. गुरुवारी सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली. सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅमसाठी २६० रुपयांनी तर चांदीचे दर ४०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सोने प्रति ग्रॅमसाठी ५०,४५० रुपयांवर तर चांदी ६८,१९० रुपयांवर पोहोचले आहेत.
असे आहेत मागील आठवड्यातील दर
गेल्या आठवड्यात दि.८ नोव्हेंबर रोजी सोन्याचे दर ४३० रुपयांनी, ९ नोव्हेंबर ४० रुपयांनी, १० नोव्हेंबर रोजी २८०, ११ नोव्हेंबर रोजी ५८०, १२ नोव्हेंबर रोजी ३७०, १५ नोव्हेंबर रोजी १०० रुपयांनी वाढले होते. त्यामुळे ५०,४७० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर दि.१६ नोव्हेंबर रोजी २० रुपयांनी तर दि.१७ नोव्हेंबर रोजी १६० रुपयांनी सोन्याचे दर कमी झाले होते. त्यामुळे सोने प्रति १० ग्रॅमसाठी ५०,१९० रुपयांवर पोहोचले होते. गुरुवारी पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सोने पुन्हा ५०,४५० रुपयांवर पोहोचले आहे.
असे होते चांदीचे दर
दि.८ नोव्हेंबर रोजी चांदीचे दर २२० रुपयांनी, ९ नोव्हेंबर ५६० रुपयांनी वाढले होते. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी ३२० रुपयांनी चांदीचे दर घसरले होते. दि.११ नोव्हेंबर रोजी १,३४०, १२ नोव्हेंबर रोजी १,११०, १५ नोव्हेंबर रोजी १९० रुपयांनी चांदीचे दर वाढले होते. त्यामुळे चांदी ६८,७२० रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर दि.१६ व १७ नोव्हेंबर रोजी चांदीच्या दरात अनुक्रमे ६०० व ३३० रुपयांनी घसरण झाल्याने चांदी प्रति किलोसाठी ६७,७९० रुपयांवर पोहोचली होती. दरम्यान, चांदीच्या दरात गुरुवारी पुन्हा ४०० रुपयांनी वाढ झाल्याने चांदी ६८,१९० रुपयांवर पोहोचली आहे.