---Advertisement---
आरोग्य जळगाव शहर

४ पिढीनंतर झाली मुलगी, डोळ्यांच्या कॅन्सरने कुटुंब हादरले, पुढील सहा महिने मदतीची गरज

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । जळगाव शहरातील जिल्हा सहकारी दूध संघात ३५० रुपये रोजंदारीने कामाला असलेल्या गिरीश भंगाळे यांच्या १ वर्षीय चिमुकली मानसीला डोळ्यांचा कॅन्सर झाला आहे. मानसीच्या उपचारासाठी आर्थिक साहाय्य करणारी संस्था पुढील सहा महिने सहकार्य करू शकत नसल्याने भंगाळे कुटुंबाला उपचारासाठी मदतीची आवश्यकता आहे. गुरुवारी मणियार बंधूंनी एक महिन्यासाठी आर्थिक मदत केली.

news image 1

मूळ भुसावळ तालुक्यातील रहिवासी असलेले गिरीश शांताराम भंगाळे हे जिल्हा दूध उत्पादक संघात ३५० रुपये रोजंदारीने कामाला आहेत. भंगाळे परिवारात चार पिढीनंतर मुलगी झाली. गिरीश भंगाळे यांची मुलगी मानसी ही ३ महिन्यांची असताना तिच्या डोळ्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. मुंबई येथील वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला असता त्यांनी हैद्राबाद येथे उपचार घेण्याचे सुचविले.

---Advertisement---

मानसीवर गेल्या ९ महिन्यांपासून हैद्राबाद येथे उपचार सुरु आहे. आजवर मानसीवर ५ केमो थेरपी आणि ५ लेझर थेरपीने उपचार झाले आहे. डाव्या डोळ्याने तिला दिसू लागले असून आणखी उपचाराची गरज आहे. मानसीवर पुढील पाच वर्ष उपचार करावे लागणार असून त्यांना तेलंगणातील एक संस्था मदत करीत आहे. संस्थेच्या आर्थिक अडचणीमुळे सहा महिने प्रतिमाह १७ हजार ५०० रुपये मानसीच्या पालकांना घरून उपचार करावे लागणार आहे.

जळगावातील मणियार बंधूंनी मानसीच्या उपचारासाठी एका महिन्याची मदत केली आहे. तिच्या पालकांनी मदतीसाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. जळगाव जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी पुढील ६ महिन्याच्या उपचारासाठी मदत करावी असे आवाहन आम्ही जळगाव लाईव्ह न्यूजच्या वतीने करीत आहोत. मदतीसाठी ९८२५७०६७४७ यावर संपर्क साधावा.

पहा व्हिडिओ वृत्त :

एक वर्षाच्या चिमुकलीला डोळ्यांच्या कॅन्सरने ग्रासले, उपचारासाठी मदतीची गरज

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---