⁠ 
शनिवार, जून 15, 2024

अ‍ॅड.उज्वल निकमांनी दर्शविली गोंडगाव खटला चालवण्याची तयारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२३ । भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आज (८ऑगस्ट) गोंडगाव येथील पिडीत कुटुंबाची भेट घेतली. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची नियुक्ती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.यानंतर चित्राताई वाघ यांनी ऍड. उज्वल निकम यांना मोबाईलवरून संपर्क साधला. याप्रसंगी ऍड. निकम यांनी आपण हा खटला चालवण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेतील आरोपी जेलबंद असून त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी जिल्ह्यातील काही ठिकाणी मोर्चे काढले जात आहे. दरम्यान, चित्रा वाघ यांनी आज गोंडगाव येथील पिडीत कुटुंबाची भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्या सोबत आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी चित्रा वाघ यांनी या कुटुंबाशी संवाद साधून त्यांच्या कडून माहिती जाणून घेतली. यात हा नराधम यांचाच शेजारी असून त्यांच्या कुटुंबाशी कोणतेही वाद नव्हते. मात्र या नराधमाने भयंकर कृत्य करून या बालिकेची क्रूर हत्या केली अशी माहिती त्यांना सांगण्यात आली. याप्रसंगी आम्हाला न्याय हवा आणि या प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यानंतर चित्राताई वाघ यांनी ऍड. उज्वल निकम यांना मोबाईलवरून संपर्क साधला. याप्रसंगी ऍड. निकम यांनी आपण हा खटला चालवण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. यावर चित्रा वाघ यांनी कायदेशीर बाबींची तात्काळ पूर्तता करून ऍड. निकम हे गोंडगाव येथील बालिकेचा खटला चालविणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, या प्रकरणातील अनेक पैलू हे चित्राताई वाघ यांनी पिडीत कुटुंबाकडून जाणून घेतले. तसेच त्यांनी याप्रसंगी भारतीय जनता पक्षातर्फे सदर कुटुंबाला मदतीचा धनादेश देखील प्रदान केला.