⁠ 
रविवार, सप्टेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | शिवजन्मोत्सव राज्यस्तरीय स्पर्धेत ऍड.सोनार द्वितीय

शिवजन्मोत्सव राज्यस्तरीय स्पर्धेत ऍड.सोनार द्वितीय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । शिवप्रेमी ‘सुवर्णगिरी किल्ल्याचा मी एक मावळा’ परिवार यांनी १७ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेत अमळनेर येथील ऍड. सारांश धनंजय सोनार यांनी द्वितीय क्रमांक पटकावून अमळनेरचे शिरपेचात तुरा रोवला.’शिवनीती व स्वराज्य’ या विषयावर आपले मत प्रदर्शन करून ऍड. सारांश सोनार यांनी उपस्थितांना प्रभावित केले. त्यांना पाच हजार रुपये रोख, चषक व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील शिवप्रेमी ‘सुवर्णगिरी किल्ल्याचा मी एक मावळा’ परिवार आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत ऍड. सारांश सोनार यांनी मिळविलेल्या यशा बद्दल ऍड. एस.आर. पाटील, प्राचार्य विजय बहिरम, प्राचार्य पी.आर. शिरोडे, माजी प्राचार्या ज्योती राणे, प्रा.डॉ.नितीन पाटील, प्रा.डॉ.रमेश माने, डिगंबर महाले, प्रा.डॉ.संदीप नेरकर, प्रा.डॉ.लीलाधर पाटील, प्रा. पराग पाटील, प्रा.विजय तुंटे, सतीश देशमुख, डॉ.जी.एम. पाटील, सचिन खंडारे, रवींद्र विसपुते, श्याम सोनार, विशाल विसपुते, सुमित विसपुते, संदीप घोरपडे, प्रा. अशोक पवार, गणेश खरोटे सह सुवर्णकार समाज व पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले.
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, मा.आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, ऍड. ललिता पाटील , डॉ. रवींद्र चौधरी यांनी विशेष कौतुक केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह