⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

जुना वाद : ॲड.पियुष पाटलांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महा पोलीस न्यूज | ५ फेब्रुवारी २०२४ | जळगाव शहरातील ॲड.पियूष नरेंद्र अण्णा पाटील यांनी गेल्या वर्षी काका आणि इतर सदस्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात आम्ही सांगू त्याप्रमाणे ‘शपथपत्र दे’ या मागणीसाठी ॲड.पियुष पाटील यांचे अपहरण करीत त्यांना बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केल्याचा प्रकार डिसेंबर महिन्यात घडला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ॲड.पियूष पाटील यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या वर्षापुर्वी मालमत्तेच्या वादातून ॲड.पियूष पाटील यांनी पोलिस ठाण्यात काकांविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यावेळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात त्यांच्या काकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याविषयी आम्ही सांगू त्या प्रमाणे शपथपत्र दे या मागणीसाठी त्यांचे काका संजय भास्कर पाटील, विजय भास्कर पाटील यांच्यासह सुहास वसंत चौधरी, नरेंद्र गुलाब गांगुर्डे आणि शैलेजा नरेंद्र गांगुर्डे या पाच जणांनी ॲड.पियुष पाटील यांचे अपहरण केले. त्यांचे हातपाय बांधून बंदुकीचा दाखविला व कमरेच्या पट्ट्यांनी बेदम मारहाण करून त्यांच्या पँटच्या खिशातून आठ ते नऊ हजार रुपये काढून घेतले.

तसेच तू आमच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात आम्ही सांगतो तसे शपथपत्र दे नाहीतर तुला जिवेठार मारू अशी धमकी दिली होती. अपहरण आणि मारहाणीची घटना दि.२८ डिसेंबर २०२३ ते दि.२९ डिसेंबर २०२३ दरम्यान दीक्षितवाडी परिसरात घडली होती. याप्रकरणी ॲड.पियूष पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दि.४ मार्च रोजी संजय पाटील, विजय पाटील, सुहास चौधरी, नरेंद्र गांगुर्डे, शैलेजा गांगुर्डे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि मीरा देशमुख करीत आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाकडून पोलिसांना यासंबंधी घराच्या झाडाझडतीचे आदेश मिळाले होते. आदेशानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, सपोनि मिरा देशमुख यांच्यासह एलसीबीचे उपनिरीक्षक गणेश वाघमारे व त्यांचे सहकारी विजय पाटील यांच्या घरी दाखल झाले. पोलीसांनी घराची झाडाझडती घेण्यासाठी संबंधितांना फोन केले, मात्र त्यांच्याकडून प्रत्युत्तर न मिळाल्याने तासाभरानंतर पोलीस माघारी फिरले.