संस्कारासोबत कलाभान वाढविणारी बालरंगभूमी परिषद – ॲड.निलम शिर्के सामंत

नोव्हेंबर 29, 2025 10:19 AM

बालरंगभूमी परिषदेच्या जल्लोष लोककलेचा महोत्सवाचा उद्‌घाटन सोहळा संपन्न

balrangbhumi

जळगाव लाईव्ह न्यूज । कोरोना काळात मोबाईलच्या जवळ गेलेल्या बालकांना मोबाईलपासून दूर नेवून त्यांच्या आपल्या महाराष्ट्राचे, आपल्या मातीचे संस्कार घडविण्यासोबत त्यांच्यात कलाभान वाढविण्यासाठी बालरंगभूमी परिषद कार्यरत असून, विविध महोत्सव, उपक्रम व शिबिरांच्या माध्यमातून बालकांसाठी संपूर्णतः विनामूल्य काम करणारी बालरंगभूमी परिषद आहे, असे प्रतिपादन बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांनी केले. बालरंगभूमी परिषदेच्या जल्लोष लोककलेचा या महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

बालरंगभूमी परिषदेमार्फत बालकांमध्ये महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा यासोबतच लोककलांची महती पोहचावी. या लोककलांचा त्यांनी अभ्यास करण्यासोबत त्याचा आनंदही घ्यावा या उद्देशाने ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाचे बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी रंगमंचावर बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत, प्रभारी प्रमुख कार्यवाह व जळगाव शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, ज्येष्ठ लोककलावंत जयश्रीताई पाटील, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, उपाध्यक्ष नेहा पवार, कोषाध्यक्ष सचिन महाजन यांच्यासह समूह लोकनृत्य स्पर्धेचे परीक्षक डॉ.सुचित्रा लोंढे, सचिन भिडे आदी उपस्थित होते.

br2

उद्‌घाटनसोहळ्याचे प्रास्ताविक प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले. त्यानंतर उद्‌घाटक म्हणून बोलतांना ॲड.निलम शिर्के सामंत यांनी बालरंगभूमी परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना देत, पालकांना बालरंगभूमी परिषदेला सहकार्य करण्याचे तसेच बालकांनी बालप्रेक्षक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन केले. आज दि. २८ नोव्हेंबर रोजी महोत्सवातील समूह लोकनृत्य सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणीत जिल्ह्यातील २४ विद्यालयातील २८० बालकलावंतांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रध्दा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन योगेश शुक्ल यांनी केले.
या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेचे उपाध्यक्ष अमोल ठाकूर, आकाश बाविस्कर, मोहित पाटील, सुदर्शन पाटील, पंकज बारी, हर्षल पवार आदी पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now