बेरोजगारीच्या नैराश्येतून शिरसोलीच्या प्रौढाची आत्महत्या

मार्च 22, 2021 7:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । बेरोजगारीच्या नैराश्येतून तालुक्यातील शिरसोली येथील ४० वर्षीय प्रौढाने  गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आले आहे. विशाल सुभाष पाटिल (वय-४०) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime

शिरसोली प्र.न. येथील रहिवासी विशाल पाटील यांना दारुचे व्यसन जडले होते. बेरोजगारीतून व्यसनाधीनता यातुन नैराश्याच्या भावनेतून घरात कोणीही नसतांना आज २२ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

Advertisements

विशाल यांच्या पाश्चात पत्नी व दोन मुले  असा परीवार आहे.  दुपारी दोन वाजेच्या सुमारास कुटूंबीयांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ उतरवुन जिल्‍हारुग्णालयात आणले डॉक्टरांनी तपासणी केल्यावर मयत घोषीत केले. एमआयडसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now