---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा पारोळा

आजाराला कंटाळून पिंपळकोठा येथील प्रौढाची आत्महत्या

adult suicide at pimpalkotha
---Advertisement---

 

adult suicide at pimpalkotha

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । पारोळा तालुक्यातील पिंपळकोठा येथे एका प्रौढाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना काल घडली.

---Advertisement---

नवनीत भगवान पाटील (४८ ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

नवनीत पाटील हे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. दि. ७ रोजी त्यांनी त्यांच्या घराशेजारील शाळेच्या आवारात असलेल्या एका झाडाला गळफास घेतली. ही घटना पहाटे ५ वाजता घडली. याबाबत काही नागरिकांनी ही घटना बघितली असता, त्यांनी घरच्या मंडळींना माहिती दिली.

 

यावेळी प्रमोद पाटील, मुकेश पाटील, राजेश पाटील यांनी नवनीत पाटील यांना खाली उतरवित पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉ. योगेश साळुंखे यांनी त्यास मयत घोषित केले याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद होउन पुढील तपास हवलदार नाना पवार करत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---