आदिवासी कोळी महासंघ, आदिवासी संघर्ष समितीतर्फे ७ रोजी राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२१ । आदिवासी कोळी महासंघ आणि आदिवासी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.७ रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी कॅबिनेटमंत्री तथा आदिवासी लोकनेते डॉ.दशरथ भांडे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा पार पडणार असून सर्व अन्यायग्रस्त आदिवासी कोळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी केले आहे.
आदिवासी कोळी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा व त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी आदिवासी कोळी महासंघ आणि आदिवासी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व माजी कॅबिनेटमंत्री तथा आदिवासी लोकनेते डॉ.दशरथ भांडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि.७ रोजी शेगाव येथे एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात महाराष्ट्रात १ कोटी ३० लाख आदिवासी जमातींची संख्या असुन त्या पैकी एक कोटी आदिवासींना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. त्यांच्या हक्काचे व आरक्षणाचे संसदेने दिलेले हक्क राज्यातील समाजावर होणारे शैक्षणिक व नोकरी विषयक, निवडणुकीत जात प्रमाणपत्रामुळे पदांवर येणारे गंडांतर अशा अनेक विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत.
मेळाव्यास उत्तर महाराष्ट्र विभाग व जळगाव जिल्हा, महानगरातील सर्व अन्यायग्रस्त कोळी समाज बांधव, कर्मचारी बांधव, महिला व युवकांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे, आदिवासी नेते बाळासाहेब सैदाणे, जळगाव जिल्हाध्यक्ष नितीन कांडेलकर, जिल्हा आदिवासी नेते जगन बाविस्कर, महिला जिल्हाध्यक्ष सुनिता कोळी, मंगल कांडेलकर, कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष प्रशांत सोनवणे, एस.टी. सेवानिवृत्त संघटनेचे दिलीप इंगळे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष संजय कांडेलकर, रावेर तालुकाध्यक्ष मनोहर कोळी, यावल तालुकाध्यक्ष जालंधर सोनवणे, जळगाव महानगर युवक अध्यक्ष दिपक सोनवणे, जळगाव तालुकाध्यक्ष अशोक सपकाळे, कैलास धरणगाव तालुकाध्यक्ष सोनवणे, शंभू शिवरे, पाचोरा अध्यक्ष सचिन कोळी, भुसावळ तालुकाध्यक्ष गणेश सोनवणे, एरंडोल तालुकाध्यक्ष अभिमन कोळी, अमळनेर अध्यक्ष किरण कोळी, चाळीसगाव अध्यक्ष बापू कोळी, बोदवड तालुकाध्यक्ष जगदीश कोळी, जिल्हा महिला मार्गदर्शक रजनी सोनवणे, जळगाव महानगर उपाध्यक्ष भुषण सपकाळे यांच्याकडून करण्यात आले आहे.