⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | धरणगावात गद्दारांचा जळफळाट, आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले !

धरणगावात गद्दारांचा जळफळाट, आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । माजी मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज शनिवारी जळगाव दौऱ्यावर येत आहे. पाचोरा, धरणगाव व पारोळा येथे त्यांचा संवाद कार्यक्रम होणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत बॅनर लावण्यात आले आहे. मात्र धरणगावात आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री उघडकीस आल्यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.

गेल्या काही दिवसापूर्वी प्रकृती अस्वास्थामुळे आदित्य ठाकरे यांचा नियोजित दौरा ऐनवेळी रद्द झाला होता. मात्र, आज ते जिल्हा दौऱ्यावर येत आहे. पाचोरा, धरणगाव व पारोळा येथे त्यांचा संवाद कार्यक्रम होणार आहे. यात दुपारी १-०० वाजता धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आयोजित केला आहे. यानिमित्ताने धरणगाव शहरात शिवसेना व युवा सेना कडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत बॅनर जागोजागी लावले आहेत.

मात्र, आदित्य ठाकरे यांचा आज धरणगावात ज्या मार्गाने प्रवेश होणार आहे. त्याच मार्गावरील बॅनर मध्यरात्री काही अज्ञातांकडून फाडण्यात आले आहे. जवळपास सहा ते सात ठिकाणी हे बॅनर फाडण्यात आल्याचे कळतेय. द्वेष भावनेतून शिवसेना, युवासेनेचे स्वागत फलक (बॅनर) फाडल्याचा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला असून, या घटनेमुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ व कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष देविदास बापू महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, किरण अग्निहोत्री, रविंद्र जाधव, भरत माळी आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सूचना दिल्या.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.