जळगावात आणखी एका देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त; एका पुरुषासह दोन महिला ताब्यात

डिसेंबर 29, 2025 8:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या एका कुंटणखान्याचा (वेश्याव्यवसाय अड्डा) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. योगेश्वर नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, कुंटणखाना चालवणाऱ्या मालकासह दोन महिला आणि एका पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

kuntankana jpg webp

नेमकी घटना काय?
शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील योगेश्वर नगर भागात छुप्या पद्धतीने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. खात्री पटताच पोलिसांनी संबंधित ठिकाणी अचानक धाड टाकली.

Advertisements

या छाप्यात घटनास्थळी कुंटणखाना चालवणारा मालक आणि दोन महिला आढळून आल्या. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मालकासह तिघांना ताब्यात घेतले आहे. भरवस्तीत सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत होत आहे.

Advertisements

ही यशस्वी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवींद्र मोतीराया, पोलीस कॉन्स्टेबल अवेश शेख, पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल प्रणय पवार, महिला पोलीस कर्मचारी स्मिता पाटील यांनी ही कारवाई केली. शनिपेठ पोलिसांनी अवैध व्यवसायांवर आपला करडी नजर ठेवली असून, अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहतील, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now