---Advertisement---
जळगाव शहर

जळगाव विभागातील २२ एसटी कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई

jalgaon bus stand
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । एसटीच्या विलीनीकरणावरून गेल्या दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. भरघोस पगारवाढ करूनही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहे. दरम्यान,बेमुदत संपात सहभागी झालेल्या जळगाव विभागाच्या २२ बस कर्मचार्‍यांवर सोमवारी बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. काल राज्यात एकूण 174 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. 

jalgaon bus stand

राज्यभरात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचं कामबंद आंदोलन सुरू आहे. यात प्रशासनाने कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहनही केले. मात्र, कर्मचारी शासनात विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे विभागातील काही कर्मचाऱ्यांना निलंबित, सेवा समाप्ती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना अनेकदा आपली बाजूही मांडण्याची संधी दिली. मात्र, या कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय कारवाईस अवैध ठरवत तसेच दुखवट्यात असल्याचे कारण सांगून प्रशासकीय चौकशीस नकार दिला. त्यामुळे एसटी प्रशासनाने आपणास बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली होती. तरीही संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासा न मिळाल्याने प्रशासनाने विभागातील २२ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केल्याची घोषणा सोमवारी केली. जळगाव विभागातील २२ कर्मचाऱ्यांमध्ये ८ जळगाव आगारातील तर १४ कर्मचारी हे विभागातील आहेत.

---Advertisement---

जळगाव आगार व विभातील २२ बडतर्फ कर्मचारी :

भालचंद्र हटकर, मनोज सोनवणे, सोपान सपकाळे, ललित गायकवाड, यशोदा सोनवणे, शैलेश नन्नवरे, अतिष परदेशी, अयाज खान या जळगाव आगारातील आठ कर्मचाऱ्यांचा बडतर्फीमध्ये समावेश आहे. तर विभागात नितीन मोरे, हेमंत चौधरी, जितेंद्र पिंगळे, संतोष सपकाळे, योगेश पारधी, रवींद्र भोई, शशिकांत निंभोरे, अकिब शेख, समाधान तायडे, दीपक पाटील, मनोज सपकाळे, नरेंद्र देसाई, नीलेश लोखंडे, विश्वास हिदे यांचा समावेश आहे. जळगाव आगारासह विभागात एकूण २२ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---