जळगाव लाईव्ह न्यूज । विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क चोपडा विभाग व अमळनेर विभाग आणि जळगाव भरारी पथक यांच्या संयुक्त कारवाई मुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
अमळनेर शहरात व परिसरात अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. त्यात धुळे रोड, चोपडा रोड, हेडावे रोड तसेच गलवाडे रोडवरील आसोदा मटन हॉटेल, साई पॅलेस, हॉटेल फाल्गुनी, हॉटेल श्रावणी, बाबाजी का ढाबा, हॉटेल निर्मल अशा अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या ढाब्यांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ ई, अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तसेच अमळनेर नगर पालिके समोरील सुमन गार्डन जवळील मद्य सेवनास बसु देणारे व त्यांना सेवा पुरविणाऱ्या हॉटेल व बार चालकांवर महाराष्ट्र मध्यनिशेध अधिनियम-१९४९ चे कलम ६८ अन्वये व सदर इसमास विना परवाना मद्य सेवन करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम-१९४९ चे कलम ८४ अन्वये कार्यवाही करून सदर इसमांवर न्यायालय अमळनेर यांच्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. याकामी चोपडा निरीक्षक कय्युम मोमीन, दुय्यम निरीक्षक अमळनेर जी.एस. मोरे, कर्मचारी दिनेश पाटील, विपुल राजपूत, भूषण परदेशी तसेच निरीक्षक भरारी पथक जळगाव व त्यांचे कर्मचारी यांनी कारवाई केली.