जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२२ । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवल. यानंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आणि या दोन गटांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जोरदार खडा जंगी पाहायला मिळत आहे. मात्र या दोघांच्या लढाईमुळे किंबहुना खडाजंगीमुळे आज एसटीला अच्छे दिन किंवा सोनेरी दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर यंदा होणारा दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. शिवसेना पक्ष हा आता ठाकरे आणि शिंदे गटामध्ये विखुरला गेल्यामुळे दोन्ही गटाने आपापला दसरा मेळावा मोठ्या उत्साहात आणि मोठ्या ताकदीने करायचा असा ठाम निश्चय केला आहे. यामुळेच कि काय तर संपूर्ण महाराष्ट्रातून समर्थक मोठ्या प्रमाणावर मुंबईला जाण्यास तयार झाले आहेत. यात एसटीने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
शिवसेना कोणाची हे खऱ्या अर्थाने जर दाखवून द्यायच असेल तर दसरा मेळावातच दाखवायच हे सगळ्यांना वाटत आहे. दसरा मेळावा जोरदार हवा यासाठी दोन्ही गटाकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, खऱ्या अर्थाने पाहिला गेले तर यामुळे एसटीचे भले झाले. एसटीला अच्छे दिन आले असेच म्हणता येईल. कारण की, संपूर्ण राज्यभरातून शिंदे गटाकडून जवळजवळ तीन हजार बसेस बुक करण्यात आल्या आहेत. शिंदे गटाकडून एसटी महामंडळाला दहा कोटी रुपये रोख देण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे आता शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे एसटीला अच्छे दिन आले हे पाहायला मिळत आहे.