---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा भडगाव

महिलेचा विनयभंग, आरोपीला ५ वर्ष कैद

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला चक्क पाच वर्षाच्या कारावासाची व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आबा जगन पाटील असे आरोपीचे नाव आहे. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांनी शुक्रवारी दिला आहे.

court order jpg webp

तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेचा ६ मार्च २०१८ रोजी गावातीलच आबा पाटील याने घरात घुसून विनयभंग केला होता. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा खटला न्या. डी. एन. खडसे यांच्या न्यायालयात चालला. त्यात सरकारपक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडितेची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

---Advertisement---

अशी सुनावली शिक्षा

सरकारपक्षाचा प्रभारी युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी आबा पाटील याला दोषी धरले. भादंवि कलम ३५४ प्रमाणे ५ वर्षे शिक्षा व ५ हजार रुपये दंड, ३५४ अ प्रमाणे ३ हजार रुपये दंड, ३५४ ब प्रमाणे ३ वर्ष शिक्षा व २ हजार रुपये दंड, ४५२ प्रमाणे २ वर्षे शिक्षा व २ हजार रुपये दंड व अ. जा. अ. ज. प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन ३ (१) नुसार २ वर्षे शिक्षा व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे ऍड. चारुलता बोरसे यांनी कामकाज पाहिले.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---